सर्वच शिक्षक हे दिपस्तंभासारखे असतात. लेखक - अतुलसिंग दिलीपसिंग चौधरी

 सर्वच शिक्षक हे दिपस्तंभासारखे असतात.   लेखक - अतुल दिलीपसिंग चौधरी 



डॉ सर्वपल्ली राधाकृष्नन यांनी शिक्षकांच्या समाजातील अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीने ५ सप्टेंबर म्हणजेच त्यांचा जन्मदिवस 
' शिक्षक दिन ' म्हणून साजरा करण्याची विनंती केली आणी  तेव्हापासून दरवर्षी भारतात 
५ सप्टेंबर रोजी ' शिक्षक दिन ' साजरा केला जातो. 


ज्यांच्या मार्गदर्शनामुळे जीवनात प्रकाश आला, अशा ज्ञानाच्या दीपस्तंभाना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 

मी भगवद गीतेचा अभ्यासक आहे, २०१८ पासून मी भगवद गीता वाचत आहे, अनेकदा वाचली आहे. पुढेही वाचत राहणार आहे. 

श्री कृष्णाने अर्जुनाला उपदेश दिला तो अर्जुनाने घेतला का नाही घेतला, त्याच्यासोबत ठेवला का नाही ठेवला, आयुष्यात त्याचा उपयोग केला का नाही केला ?  तर माझं  असं ठाम मत आहे त्याने गीतेच्या उपदेशाचा स्वीकार केला. प्रत्येकाचं यश, यशाची परिभाषा, दृष्टिकोण वेगवेगळ्या गोष्टित अस्ते. यश अपयश हे शाश्वत नाही या जगात कोणत्याही गोष्टि शाश्वत नाही, म्हणून त्याचा अहंकार, इर्षा करणं हे अज्ञान आहे. प्रत्तेक माणुस त्याच्या आयुष्यात यशस्वी अस्तो. आणी अयुष्य ही स्पर्धा नाही. फक्त ज्ञान यथार्थ आहे.

समुद्रात वादळ आल्यानंतर मोठ मोठे जहाज पाण्यात डुबतात, जेव्हा एखाद्या नावाड्याला त्याची होडी घेऊन एका किनाऱ्याहून दुसर्या किनाऱ्यावर जायचं अस्ते तेव्हा दीपस्तंभाचा खूप मोलाचा वाटा असतो. सर्वच शिक्षक हे दिपस्तंभासारखे असतात. नावाड्याला हि कुठे जायचं आहे हे माहीत असते. ते नावाड्याला योग्य किनार्यापर्यंत पोहचवण्याचा यत्न आणी  प्रयत्न करत असतात. आयुष्यात जर काही शिकायचं असेल तर इतरांच्या अनुभवातून शिका, तुम्ही स्वतःच तुमच्या आयुष्यात अनुभव घेत राहिलात तर हा जन्म कमी पडेल असे स्वामी विवेकानंद म्हणायचे असं मी वाचलं आहे.  म्हणून अनेक पुस्तकं वाचली. ' मनात ' मानसशास्त्राची उत्कंठावर्धक रम्य सफर हे आदरणीय श्री अच्युत गोडबोले सरांचे पुस्तक वाचल्यामुळे, माणसं वाचायला शिकलो.

एका दिवसासाठी का असेना, जेव्हा मला कळलं मी ' शेठ आणी सर ' आहे तेव्हा मलाही शिक्षकदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 

खरंतर माझा अजूनही अभ्यास सुरूच आहे, आणी  मला ' सर ' व्हायचं  नाही आहे, आयुष्यभर विद्यार्थीच राहायचं आहे. आयुष्यात ज्ञान दिल्याने वाढतं, जर माझ्यापेक्षा वयाने लहान व्यक्तीला ज्ञान घ्यायचं असेल तर मला सर व्हायला नक्की आवडेल.  



कोणताही विद्यार्थी त्याच्या आयुष्यात त्याने कितीही शिक्षण घेतलं तरी तो शिक्षकांपेक्षा मोठा असूच शकत नाही. कारण शिक्षकांकडे अनुभवाचेजे गाठोडे असते, त्यांचा जो अभ्यास असतो तो त्यांनी विद्यार्थी जितका होम वर्क करत नाही, त्याहीपेक्षा जास्त त्यांनी केलेला असतो म्हणून त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक व्यक्तिमत्व व  विद्यार्थी घडवलेले असतात. 

माझ्या आयुष्यात असलेल्या सर्वच शिक्षकांना माझा नमस्कार आणी  तुमचा आशीर्वाद मी करत असलेल्या कामात सदैव माझ्या सोबत पुढेही राहील हि खात्री नक्कीच आहे. काही online ट्रेडर आणी इतर गुरुजी असतात जे वेळोवेळी विद्यार्थ्यांची hedging करत असतात त्यांचाही खूप महत्वाचे योगदान नक्कीच असते त्यांचेही आभार. 



फिल्म मेकिंग ची अनेक पुस्तकं वाचली आहे, त्यात मला मराठी मधलं शॉर्टकट ह्या पुस्तकाचा विशेष असा उल्लेख करावासा वाटतो. कोणतही पुस्तक विकत घेतलं कि ते पूर्ण वाचतो हा माझा स्वभाव आहे. आदरणीय श्री प्रसाद नामजोशी सरांच्या शॉर्टकट ह्या पुस्तकाचाही खूप उपयोग झाला, जर हे पुस्तक मी पूर्ण वाचलं नसतं तर मी अनेक लघुपट आणी डोकमेंटरी किंवा कोणतेही व्हिडिओस करूच शकलो नसतो, सरांनी त्यांच्या पुस्तकात लिहलंय माझं पुस्तक वाचून जर कोणी लघुपट केला असेल तर मला ते ऐकायला आवडेल असंच काहीतरी. सर हा लेख तुम्ही कधीतरी वाचाल ह्याची खात्री आहेच. 

२०१६ वर्षाला रावेर येथे ' व्हिडीओ पार्लर ' ह्या सरांच्या चित्रपटाचं शूटिंग होतं माझा मित्र होता आशिष मिश्रा आणी आकाश तायडे त्यांनी मला भुसावळ वरून काही आर्टिस्ट आणायला सांगितले होते, मग मी थिएटर मधे काम करणारे माझ्या ओळख परिचयाच्या आर्टिस्ट लोकांना मेसेज पाठवला, कॉल केला आणी ते तिथे आले.

सरांच्या चित्रपटाचे ' पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ' मधे स्क्रिनिंग झालं ह्याचा मला खूप आनंद झाला. 

सरांनी त्यांच्या एका व्हिडिओमध्ये ' शूटिंगसाठी ' महाराष्ट्राचा बिहार कसा कारावा हे सांगितलंय. लोकेशन कशा प्रकारे तुम्ही चिट करू शकता अश्या संधर्भात ते आहे. 

ह्याचा आमहाला Ziffy Health ची जाहिरात करतांना उपयोग झाला. 

आमचं  youtube  चॅनेल आहे @thedramalabfilms ह्यावर तुम्ही लघुपट व documentary बघू शकता. 

आम्ही मुद्दाम त्या विडिओ मध्ये नॉर्मल हिंदी ठेवली आहे कारण त्या कंपनीच्या मालकाला बिहारमधे १०० हॉस्पिटल उघडायचे होते आणी त्यांना ते व्हिडीओ तिथले जे हेल्थ  मिनिस्टर आहेत मंगल पांडे ह्यांना ते दाखवायचं होतं, आम्ही केलेलं व्हिडीओ त्यांना खूप आवडलं  आणी त्यांनी १०० हॉस्पिटल सुरु केलेत.



        आम्ही व्हिडीओचं जे काम करत आहोत त्यातून आम्हाला पैसे मिळतात व ते आमच्या उदरनिर्वाहाच्या साधनांपैके एक आहे. 



आदरणीय श्री देवदत्त भिंगारकर सर आधी रेडियो जॉकी होते, स्कूल ऑफ मीडिया आर्ट कॉलेजचे प्रॉफेसर आहेत. 

ह्यांच्याकडे पुण्यात आल्यावर २०१८ ला 

" Become A Radio Jockey "

हा ऑडिओ ( रेडिओ, पॉडकास्ट, व online माध्यम  मधे ) आवाजाचा वापर कसा करावा व त्यातले अतिशय महत्वाच्या पैलूंचा अभ्यास करतांना, मला सरांच्या ह्या कोर्सचा खूप उपयोग झाला. 

आमचे मार्गदर्शक, आदरणीय श्री सतीश कुलकर्णी सर

 आदर्श व्यक्तिमत्व, उत्तम अभिनेता, आज पर्यंत अनेक नाटक, जाहीरात, लघुपट, चित्रपटात काम केलं आहे. कलेसाठी त्यांनी आयुष्य समर्पित केलं असुन त्यांनी अनेक व्यक्तिमत्व घडवले आहेत. 


आदरणीय श्री वैभव मावळे मास्तर, तुम्ही आम्हाला लाभलेल्या सर्वोत्कृष्ट शिक्षकांपैकी एक आहात, चांगली व्यक्ती, महान कलाकार, आणी मार्गदर्शक आहात. तुमच्याबद्दल खूप प्रेम आणी आदर आहे. भुसावळच्या पु ओ नाहाटा माहाविद्यालयात असतांना  सरांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी २ वर्षांचा नाट्यशास्त्रचा अभ्यास केला आहे. नाट्यशास्त्रातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि नाट्यशास्त्रातील डिप्लोमा. 

फोटोमध्ये - सर्व नाट्यशास्त्राचे विद्यार्थी ( 2015 - 2017 )

आमच्या कॉलेजच्या लायब्ररीत, सरांच्या वाढदिवसाच्या दिवशी फोटो क्लिक केला होता.





 


Comments