आयुष्याचे वास्तविक दर्शन घडवणारा ' नाळ ' - मराठी चित्रपट ( चित्रपट समीक्षक - अतुल दिलीपसिंग चौधरी )


नाळ - मराठी चित्रपट 
चित्रपट समीक्षक  - अतुल दिलीपसिंग चौधरी





आज नाळ चित्रपट बघितला. भारतात दरवर्षी 700 च्या वर
विविध भाषिक चित्रपट तयार होतात, त्यातले काही रिलीस होतात, काही हिट आणी काही फ्लॉप होतात.


आजकाल टीव्ही बघतच नाही आणी थिएटर मध्येही क्वचितच जातो. पण youtube वर व्हिडिओस बघतो. 
फिल्म फेस्टिवल मध्ये सहभागी झालेले चित्रपट बघायला मला आवडतात. ते चित्रपट सहजासहजी टीव्ही किंव्हा Youtube वर बघायला मिळत नाहीत म्हणून तिथे जाऊन बघतो. काही फेस्टिवल्स हे सशुल्क असतात तर काही निशुल्क असतात. 



पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल हे सशुल्क फिल्म फेस्टिवल असून, 
एक नामांकित फेस्टिवल असल्यामुळे तिथे दर वर्षी आवर्जून जातो. 

आधी फिल्म थिएटर मधे नंतर मोबाईलवर अश्याप्रकारे  दोन वेळेस नाळ हा चित्रपट बघितला आहे. 
ह्या चित्रपटामध्ये एका दत्तक पुत्र चैतन्य ( चैत्याची ) आणी त्याच्या निरागस बालपणाची कहाणी दाखवली आहे.
त्याचे भावनिक विश्व आणी आईच्या प्रेमाचा शोधाचा प्रवास  बघायला मिळतो.



' नाळ ' हा चित्रपट बघितल्यावर त्याच्या लेखक, दिग्दर्शक, कलाकार आणी संपूर्ण टीमची मेहनत दिसून येते.
नाळमध्ये ' नागराज मंजुळे ' सैराट, फँड्री आणी पिस्तुल्याच्या दिग्दर्शक यांना अभिनय करतांना बघून छान वाटले.
त्यांची ' सौकार '  ही चित्रपटातली भूमिका त्यांनी सहज साकार केली, ह्या चित्रपटातील नट म्हणजे बालकलाकार श्रीनिवास पोकळे.
संपूर्ण चित्रपट त्याच्याच अवती भवती फिरतो व त्याच्या खोड्या दाखवण्यात आल्या आहेत.
त्याचे मित्र देवी आणी विशेष करून बच्चन हे पात्र मनाला भावणारं होतं. बच्चन हा त्याच्यापेक्षा वयाने मोठा मित्र आणी कशाप्रकारे ते वेगवेगळ्या क्लुप्त्या करतात ह्याचं सुंदर चित्रीकरण  आपल्याला बघायला मिळते.
नाळ ह्या चित्रपटाची कहाणी तर नक्कीच विशेष आणी हृदयस्पर्शी आहे, आणी त्यातले संगीताचे बारकावे, वाळवंटातुन बैलगाडी चालत असतांना ते मधुर संगीत आणी वाऱ्याचे मंजुळ आवाज हे ऐकण्यासारखे आहे.





ह्या चित्रपटाचे संवाद नागराज मंजुळे यांचे आहेत तर स्टोरी, स्क्रीनप्ले आणी दिग्दर्शन हे सुधाकर रेड्डी यकांती ह्यांचे आहे, ओम भुतकर यांनी साकारलेली मामाची भूमिका, जे एक महत्त्वाचं पात्र आहे, ते जर नसतं तर कहाणी पुढे गेलीच नसती. चित्रपटाचा क्लायमॅक्सचा तो क्षण मनाला फारच स्पर्श करून जातो, चैत्या जेव्हा आपल्या खऱ्या आईला भेटायला निघालेला असतो, आपली बस सुटून जाईल याची भीती त्याला असते आणि मागे बैलगाडीत त्याच्या आजीचं निधन झाल्यामुळे त्याचे वडील बैलगाडी माघारी फिरवतात. चैत्याचा हट्ट, त्याच्या वडिलांच्या आईच्या निधनाने शोकांतीका, तुम्हाला हा लेख वाचून नाही कळणार त्यासाठी तुम्हाला एकदा हा चित्रपट बघावाच लागेल, नंतर तुम्हाला कळेल आपल्या आयुश्यातले दोन तास सार्थकी लागले.




सुधाकर रेड्डी यकांती सरांना " सांड कि आँख " ह्या चित्रपटाच्या शूट दरम्यान भेटलो होतो पुण्यात, तेव्हाचा हा फोटो. 

आजकालचे धांगडधिंगा घालणारे, खून, मर्डर, मारामाऱ्या आणी लफडी करणाऱ्या चित्रपटांपेक्षा लाखपट चांगला 
चित्रपट ' नाळ ' आहे, कारण ह्यात आयुष्याचे वास्तविक दर्शन घडविले आहे.

कमी पात्र घेऊन एक उत्तम चित्रपट बनू शकतो तोही कमी खर्चात. कॅमेरा ही त्यांचा रेड ड्रयागन किंवा चित्रपटात कुठेकुठे ड्रोन वापरलेला दिसतो तोही डी जे  आय म्याविक प्रो किंवा फ्यांटम फोर असेल असं वाटत नाही, ह्या गोष्टीला अपवाद असू शकतो.

आपल्या जन्मदेणार्या आईचं दुर्लक्ष्य करणं हे चैत्याला खटकतं, त्याच्याकडे एकदाही न बघणं त्याक्षणाला त्याची खरी आई, 
दत्तक आई आणी तो यांच्या मनात चाललेला द्वंद्व. त्यातले इमोशन्स टिकवून ठेवलेले आहेत हे आपल्याला अनुभवायला भेटतं.
पण एका दत्तक पुत्राच्या दृष्टीने बघितल्यास आपल्या सख्या आई वाडीलांपेक्षा आपल्याला दत्तक घेणारे आई वडील हे मला जास्त महत्वाचे वाटतात. मी दत्तक पुत्र नाही पण हा चित्रपट जर मी बघितला नसता तर माझ्या आयुष्यातली माझी खरी आई, 
अजून चांगल्या प्रकारे कळली नसती. ह्या चित्रपटातल्या खरं तर मी चूका शोधण्याचा भरपूर प्रयत्न केला पण ते मला शक्य झालं नाही. ह्या चित्रपटात फक्त माणसांच्याच भावना नाही तर ते मुकं जनावर म्हशीच्या आणी तिच्या पिल्लाची जेव्हा नाळ तुटते आणी कश्या प्रकारे ती म्हैस दूध द्यायला बंद करते. हे सुंदर इमोशनल टच अनुभवायला भेटले, चित्रपटाचा शेवट हा गोड दाखवला आहे.
चैत्या आपल्या दत्तक घेतलेल्या आईला, ' आई ' म्हणून  हाक मारतो आणी तिथे चित्रपट संपतो.

whatsapp - +91-9021117319
चित्रपट समीक्षक  - अतुल दिलीपसिंग चौधरी

Comments