माय लव्ह स्टोरी - अजंता - Atul D Chaudhari

माय लव्ह स्टोरी अजंता - Atul D Chaudhari


ह्या पोस्ट मधून मला आपल्याला माझ्या आयुष्यात घडलेला अविस्मरणीय दिवसाचा अनुभव सांगायचा आहे.
(21 October 2018)
मला दोन दिवसांची सुट्टी असल्यामुळे मी माझ्या घरी भुसावळला जायला निघालो होतो ट्रॅव्हल्सने.
पुणे वरून भुसावळला प्रवास करत असताना ट्रॅव्हल्स जेव्हा औरंगाबाद ला होटेल वर रात्री जेवणासाठी थांबली तेव्हा सर्व प्रवासी खाली उतरले तेव्हा मी पण खाली उतरलो.
 आमच्या ट्रॅव्हल मधून एक फॉरेनर बाई खाली उतरली ती ड्राइवरशी काही तरी बोलण्याचा प्रयत्न करत होती पण त्याला इंग्रजी येत नसल्यामुळे किंवा तिची भाषा त्याला समजत नसल्यामुळे त्याने मला तिच्याशी बोलायला सांगितले.



मी तिच्याशी बोलल्यावर तिला वॉशरूमला जायचं आहे असं कळले. मी तिला " Go with that lady " म्हणून सांगितले. 
फ्रेश होऊन आल्यावर त्या महिलेशी मी गप्पा केल्या. तिने तिचं नाव एलेन नुएंहौसे असे सांगितले. ती तीन महिने सुट्टी काढून नेदरलॅंडस वरून भारतात फिरण्यासाठी आलेली आहे व ती उद्या सकाळी अजंता बघायला जाणार आहे असं तिने सांगितले. 
आमच्या इंग्रजी मधल्या गप्पा इतर प्रवासी कुतूहलाने ऐकत उभे होते.
मी तिला Dial 100 असं सांगितलं आणी म्हटलं हा महिलांचा सुरक्षा नंबर आहे, तुला कुठेही काही अडचण आल्यास ह्या नंबर वर कॉल कर. तीने मला थँक्स म्हटले, तिच्या चेहऱ्यावर स्मित होतं.
 तिला मी फेसबुक वर ऍड केलं, मग आम्ही चहा घेतला, आणी ट्रॅव्हल्स मधे चढलो आणी प्रवास सुरु झाला. 
मी माझ्या सीट वर जाऊन झोपून गेलो. अचानक मला सकाळी 5 - 5.15  ला जाग आली मी खिडकीच्या बाहेर डोकावून बघितलं, अजून दिवस उजळला नव्हता, बस अजंताला गेट जवळ थांबली होती, एलेंन उतरण्याची तयारी करत होती, अजंता हे सकाळी 10 वाजे पर्यंत उघडणार होतं, मी विचार केला ही महिला इतक्या सकाळी कुठे उतरणार, काय करणार अशे अनेक विचार माझ्या मनात येत होते, मग मी ड्रायव्हर कडे जाऊन त्याला कुठे तरी गेस्ट हाऊस वर तिला सोडण्यासाठी सांगितले.
एलेंन गेस्ट हाऊस वर उतरली आणी मग ट्रॅव्हल्स पुढच्या प्रवासाला निघाली.
मी विचार केला आज मी अजंता ला जाण्याची संधी गमवली. परदेशातून पर्यटक इथे येतात आणी आपण इतक्या जवळ राहत असूनही इथे आज पर्यंत कधी गेलो नाही. मला भुसावळला घरी  यायचं होतं आणी अजंता जाण्याचीही इच्छाही होती, विचार करता करता नेरी, पाळधी ही गावं गेली.
गाडीतून उतरू कसा ? ड्राइवर काय विचार करेल याने भुसावळचं तिकिट काढलं आणी हा असा मधेच का उतरला ?  किंवा असं कुठेही उतरून मला काही वाहन मिळेल का ? परत अजंता जायला, अशे अनेक विचार मनात येत होते घरच्यांना sms पाठवून दिला 
" मी अजंता जातोय दुपारून येईल." व एलेनला फोन केला आणी म्हटलं, " i'm coming to ajanta,
today I have Holiday and I have not visited ever, can I join and guide you to ajanta."
She said "yes, off course".
असं सर्व विचार करता करता  गाडी चिंचोली ह्या खेड्या गावात थांबली एक प्रवासी खाली उतरला, हिम्मत करून, मी पण तिथे उतरायचं धाढस केलं व गाडी सोडली. सकाळचे 6:30 वाजले होते इतक्या लवकर अजंता ला जाण्यासाठी बस मिळणं अशक्य होतं. तिथे ऍलेन माझी वाट बघत बसली होती. तिला मी 10 वाजे पर्यंत येतो असं सांगितलं होतं पण मी म्हटलं ती परदेशातून इथे आलेली आहे, आपल्यामुळे तिचा वेळ वाया नाही गेला पाहिजे थोडं लवकर पोहोचलं पाहिजे, एका मोटोरसायकल धारकाला हाथ देऊन त्याच्या सोबत नेरी पर्यंत गेलो तिथे उतरल्यावर एका फोर व्हिलर वाल्या सोबत अजंताच्या त्या गेस्टहाउस वर पोहचलो.
 8 वाजे पर्यंत मला बघून तिने स्मितहास्य केलं "you reached early" i said "yes".
तिथे नाश्ता केला, सोबत पाण्याच्या बाटल्या आणी बिस्कीट घेतलं.


आणी अजंता गुफा बघायला आम्ही गेलो. तिथे पोहचल्यावरही सोबत चालतांना आम्ही बोलत होतो,
 ती सांगत होती कसा आमचा देश नेदरलँड्स  खूप लहान आहे, तिथे फक्त वर्षातून एकदा कारनिव्हल हा सण साजरा होतो. तिथले लोक स्त्री पुरुष दोघेही आठवड्याच्या सातही दिवस काम करतात आणी सुट्टी फक्त गरज पडेल तेव्हा घेतात. मुलांचा सांभाळ आई वडील दोघेही आलटून पालटून घेतात. तिथे स्त्री पुरुष समानता आहे हे तिच्या बोलण्यातून लक्षात येत होतं.
ती महिला जिमला जाणारी असल्यामुळे हाताचे मसल्स दिसत होते, ती शाखाहारी होती, ती कशा प्रकारे आहार घेते हे ती सांगत होती, पुढे तीने विचारलं " why do people worship cows in India ? "
मग मी तिला सविस्तर माहिती दिली जी तुम्हाला माहिती आहेच. तिने बोलता बोलता सांगितलं मला माझ्या देशाचा काहीच अभिमान नाही आहे, मग मी तिला सांगितलं कसा मला गर्व आहे भारतीय असल्याचा पुढे तिने भारतात जॉब करण्याची इच्छा आहे असे सांगितले मी "you are welcome" असे म्हटले.
भारतातील सण, इथले लोक, वेगवेगळ्या जाती, धर्म कशे एकत्र व आनंदाने राहतात, अशा बऱ्याच विषयावर आम्ही बोललो.
आता मुख्य गोष्ट सांगतो, बरेच लोक अजंता गेल्यावर फक्त गुफा बघतात, तिथे पुस्तक घेतात किंवा गाईड करतात.
तो माहिती सांगत राहतो लोकं ऐकत राहतात. काही लोकं जे कधीच अजंताला गेलेले नाही किंवा जाण्याचा ज्यांचा विचार नाही अशे लोकं, म्हणतात तिथे दगड बघायला का जायचं किंवा तिथे गेले तरीही त्यांना काय बघायचं, अनुभवायचं हे माहित नसतं, किंवा अभ्यास नसतो. मी अजंता वर भरपूर लिहू शकतो पण लेख मोठा होईल.
अजंता गुफा ह्या डोंगर पोखरून तयार करण्यात आलेल्या आहे आणी विशेष म्हणजे यांची रचना कळसाकडून पायथ्याकडे झालेली आहे.
अजंता ला गेल्यावर अजंता सगळ्यात आधी जिथून बघायला मिळाली त्या view point वर जर तुम्ही नाही गेलात तर तुमची सहल अपूर्ण राहील.


मी सुरवातीला ज्या शिर्षकाचे वर्णन केले आहे

माय लव्ह स्टोरी अजंता
ती एक तिथे घडलेली प्रेम कहाणी आहे,

इंग्रजांच्या काळात भुसावळ हे इंग्रजांचं मुख्य निवासस्थान होतं, इथे त्यांनी मोठं रेल्वे जंक्शन उभारलं.
भारतातलं दोन नबरचं मोठं  जंक्शन भुसावळ आहे, व एक नबरचं कोलकाता हे आहे.
त्या काळात  अजंता एक घनदाट जंगलाने वेढलेलं खेडं होतं व त्या जंगलात खूप वाघ होते.
काही ब्रिटिश अधिकारी वाघांची शिकार करण्यासाठी त्यांनी अजंता ह्या खेड्या गावत आपला मुक्काम केला.
जंगलात फिरत असतांना त्यांना जाणवलं की पाण्याच्या एका धबधब्यातून असंख्य खबुतर, पोपट व इतर पक्षी बाहेर येत आहेत, त्यांना हे बघून आश्चर्य वाटलं, त्यांना वाटलं ह्या धबधब्या मागे काहीतरी असणार म्हणून त्यांनी ते पाणी अडवलं व तिथे त्यांना गुफा दिसली असा अजंताचा शोध लावला गेला, व तिथे 36 गुंफांचा शोध लागला. ज्या 5 व्या शतकात बनल्या आहेत.
त्यातलेच एक अधिकारी म्हणजे मेजर रॉबर्ट गिल. ते एक चित्रकार व फोटोग्राफर होते व रॉयल एशियाटिक सोसायटीचे सदस्य होते.
त्यांनी त्यांच्या अवघ्या आयुष्यात 150 वाघांची पायदळ जंगलात फिरून शिकार केली होती. ह्या वरून तुम्ही विचार करू शकता संपूर्ण भारतात किती वाघ असतील ते. रॉबर्ट हे पारो नावाच्या एका अजंता गावातील तरुणीच्या प्रेमात पडले.
त्या दोघांनी लग्न केलं. त्यांच्या प्रेम काहाणीवर 2012 साली मराठी चित्रपट " अजिंठा " बनला आहे. अजिंठा हा नितीन चंद्रकांत देसाई दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. हे मराठी बौद्ध आदिवासी पारो ( सोनाली कुलकर्णी ) आणि ब्रिटिश मेजर रॉबर्ट गिल 
( वॉलेस ) यांच्यातील एक प्रेमकथा कथन करते, एक कलाकार, जेव्हा तो ऐतिहासिक वास्तू आणि धर्मग्रंथ रंगविण्यासाठी भारतात आला होता. ऐतिहासिक अजिंठा लेणी आणि लेण्यांच्या भिंतींवर प्राचीन बौद्ध संस्कृती दर्शविणारी सुंदर चित्र प्रदर्शित आहेत.
रॉबर्ट यांनी त्यांचं उर्वरित आयुष्य अजंता मधेच व्यतीत केलं. रॉबर्ट वयाच्या 74 व्या वर्षी मरण पावले त्यांची कबर भुसावळ च्या ख्रिस्ती कॅथॉलिक कब्रिस्तान इथे आहे.
ही गोष्ट मी एलेनला त्याच view point वर सांगत होतो. जिथून अजंता शोध लावतांना पहिल्यांदा दिसली होती.
( 8 व्या गुफे पासून viewpoint वर जाता येतं, पुलावरून, खाली वाघोर नदी आहे )

टीप:- तुमच्या आसपास भलेही तुम्ही भारताच्या कोणत्याही प्रदेशात राहत असाल, अभिमान बाळगा भारतीय असल्याचा, 
कचरा करू नका, असल्या ठिकाणी आपली नावे लिहू नका.

हाच उद्देश होता माझा एखादया स्त्री सोबत अजिंठ्याला जायचा आणी तिथे फक्त दगड नसून एक जिवंतपणा, 
तिथली एक प्रेमकहाणी आहे हे सांगायचं होतं, फरक फक्त इतका आहे ती स्त्री माझी बायको किंवा प्रेयसी नसून एक परदेशी महिला होती माझ्या आईच्या वयाची.

जर तुम्ही ही पोस्ट सुरुवात पासून ते शेवट पर्यंत,
वाचली असेल तर comment मध्ये मला तुमच्या प्रतिक्रिया वाचायला आवडतील.


Comments

Ornaldo Depp said…
This Is The Courage Man.... That's Good Keep It Up 😎🏁
blogg said…
Thanks Shubham
blogg said…
Thanks friend
Unknown said…
Khup chan👍👍👍
blogg said…
Thanks friend
Unknown said…
Very nice... I like it. 👌👌👌
Unknown said…
Mast lihilays. Atul likhte rahi bhai.