आरसा A_tale_of_Guru_and_Shishya

आरसा
आरसा - Aarasa (the Mirror)
A tale of Guru and Shishya
(Marathi)
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Guru pournima
आज Tuesday 16 July 2019
 आजच्या ह्या शुभ दिवशी मी अतुल दिलीपसिंग चौधरी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो.

  एक शिष्य  आपल्या गुरूंच्या घरी मनोभावे
गुरुंची सेवा करून शिक्षण घेत होता.



त्याच्या या सेवेमुळे गुरु त्याच्यावर प्रसन्न होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थी घरी जाण्यासाठी निघाला होता, गुरुंकडे त्याने जाण्याची आज्ञा मागितली तेव्हा गुरूंनी त्याला आशीर्वाद म्हणून एक आरसा भेट दिला व सांगितले की,हा दिव्य आरसा (दर्पण)
असून यात मानवी मनात चालणारे विचार प्रगट होऊन दिसतात. विद्यार्थी मोठा आनंदीत झाला. हा आरसा खरेच कार्य करतो की नाही याची शहानिशा करण्यासाठी त्याने लगेच आपल्या गुरुं समोर हा आरसा धरला व गुरूंच्या मनात कोणते भाव आहेत, दुर्गुण आहेत हे पाहू लागला आणि गुरूंच्या समोर आरसा धरताच त्याच्या चेहर्‍यावरचा रंग पार उडाला,कारण तो आरसा गुरूंच्या अंतकरणात मोह,अहंकार, क्रोध आदी विकार दाखवीत होता.त्याला याचे फारच दुःख झाले की आपण ज्या गुरुची मनोभावे पूजा केली, ज्यांना पुर्ण ईश्वराचा दर्जा दिला,त्यांच्या मनातही विकार आहेत ?
ते सुद्धा मानवी विकारांपासून अजून सुटलेले नाहीत ?
 याचे त्याला आश्चर्य वाटले. तो गुरूंना काहीच न बोलता तो  आरसा घेऊन गुरुकुलातून निघाला, रसत्यात भेटणार्‍या प्रत्येकाच्या मनातील भाव पाहणे हे त्याचे कामच झाले होते. गावी परत जाताच त्याने आपल्या प्रत्येक परिचिता बरोबर हा प्रयोग करून पाहिला. त्याला प्रत्येकाच्या हृदयात कोणता ना कोणता  दुर्गुण दिसून आला.शेवट त्याने आपल्या जन्मदात्या आई वडिलांच्या समोरही हा असा ठेवला. ते दोघे पण त्यातून सुटले नाहीत. त्यांच्या हृदयात पण त्याला  काही  ना काही दुर्गुन दिसले.शेवटी या गोष्टीचा त्याला मनोमन राग आला  व तो गुरुकुलातील गुरुंकडे धावला.गुरुंपाशी जाऊन मोठ्या विनम्रपणे तो म्हणाला, "गुरुदेव,मी आपण दिलेल्या या आरशातून प्रत्येकाच्या मनात,हृदयात,अंतकरणात डोकावून पाहिले आणि मला असे जाणवले की प्रत्येकाच्या मनात काही ना काही विकार आहेतच,काही  ना काही दोष आहेतच.एखाद्याच्या मनात जास्त असे विकार,दोष भरुन राहिले आहेत. हे पाहून मी फार दुःखी झालो आहे,कृपया मला मार्गदर्शन करा.गुरूंनी काहीच न बोलता तो आरसा फक्त त्याच्याकडे केला,काय आश्चर्य त्याला त्याच्या मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात राग,द्वेष,अहंकार,क्रोध इत्यादी दुर्गुण भरून राहिले  दिसले.गुरुजी म्हणाले "वत्सा,हा आरसा मी तुला तुझे दुर्गुण पाहून  ते कमी करण्यासाठी दिला होता पण तू दुसऱ्यांचे दुर्गुण पाहत बसलास आणि नको तितका वेळ खर्च केलास, अरे याच काळात जर तू स्वतःचे अवलोकन केले असते तर तुला तुझ्यातील दुर्गुण सुधारता आले असते.याच काळात तू एक असामान्य व्यक्ती झाला असता. मानवाची ही कमतरता आहे  कमजोरी आहे की तो दुसऱ्यातील दुर्गुण पाहत बसतो आणि स्वतःला सुधारण्याचा  प्रयत्नही करत नाही. या आरशातून मला तुला हेच शिकवायचे होते जे तुला शिकता आले नाही.

 तात्पर्य - आपण नेहमीच दुसऱ्या व्यक्तीचे दुर्गुण बघतो, त्यावर टीका करतो पण आपल्यातील दुर्गुणांवर आपले कधीच लक्ष जात नाही.

मित्रांनो जर आपल्याला ही गोष्ट आवडली असेल तर आपल्या मित्र परिवारालाही ती share करायला विसरू नका,धन्यवाद..!!

Comments